पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राज्य महिला आयोगाने देखील तत्काळ घेतली आहे. या प्रकरणात कोणालाही सोडण्यात येणार नाही. आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. सासरच्या लोकांच्या विकृत मानसिकतेला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. राज्य महिला आयोगाने सुरवातीपासून दखल घेत १९ तारखेला सुमोटो दाखल केलं आणि बावधन पोलिसांना सूचना केल्या की तातडीने याप्रकरणी कारवाई करावी. या घटनेत आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी फरार आहे. या सगळ्या प्रकरणात राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून मी या प्रकरणात लक्ष घालून पाठपुरावा करत असल्याचं यावेळी चाकणकर म्हणाल्या.