¡Sorpréndeme!

वादळी वाऱ्यामुळे नांदेडमधील केळी बागा पडल्या आडव्या; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका

2025-05-13 9 Dailymotion

नांदेड : नांदेडमध्ये रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Unseasonal Rain in Nanded) झाला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचं आर्थिक नुकसान झालं आहे.  केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मेपासून ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात केळी काढणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात असतो. देशासह विदेशातही इथली केळी निर्यात होतात. यंदा उन्हामुळे केळीला मोठा फटका सहन करावा लागला. सतत ऊन आणि वादळी वाऱ्यामुळं पानांची अक्षरशः चाळणी झाली. यामुळं केळीचं पीक कमकुवत झालं होतं. अगोदरच प्रचंड मेटाकुलीला आलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याला रविवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं मोठा फटका सहन करावा लागला आहे. केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या असून शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.