बुलढाणा : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जात आहे. या कारवाईत भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची टाळाटाळ करत उलट भारतावर हल्ला करायला सुरूवात केली. यात पाकिस्तानला यश मिळालं नाही. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये त्यांची मुख्य ठिकाणं उद्धस्त केली आहेत. यामुळं दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला असून भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला यावेळेला कायमस्वरूपीत धडा शिकवण्यासाठी आता राज्यातील आणि देशातील माजी सैनिकांनीदेखील आपली तयारी दर्शवली आहे. काही माजी सैनिकांनी पुन्हा एकदा देशाच्या रक्षणासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्यदलात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. नेमकं काय म्हणतात माजी सैनिक जाणून घेऊयात...