¡Sorpréndeme!

Pakistani People Attari Border :भारताचे 16 नागरिक सीमारेषेवर अडकले, अटारी बॉर्डरवर परिस्थिती काय?

2025-05-02 0 Dailymotion

Pakistani People Attari Border :भारताचे 16 नागरिक सीमारेषेवर अडकले, अटारी बॉर्डरवर परिस्थिती काय?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे. पाकिस्तानने 30 एप्रिलपासून आपल्या सीमेत सरावाला सुरूवात केलेली आहे. भारताने पाकला कठोर पावलं उचलत त्याला योग्य उत्तर दिले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचीही चर्चा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी नागरिक स्वतःच त्यांच्या देशाची थट्टा करत आहेत. पाकिस्तानवर खूप कर्ज आहे. याबद्दल एक मीम देखील बनवण्यात आलं आहे.

खरं तर, पाकिस्तानला सोशल मीडियावर खूप लाजिरवाण्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. शुभम नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तानी नागरिक स्वतःच्या देशाची खिल्ली उडवत आहेत. एका पाकिस्तानी तरुणाने म्हटले, "जर भारताने आपल्यावर कब्जा केला तर त्याला आपले सर्व कर्ज फेडावे लागेल.""बाबर आझमला त्यांना त्यांच्या संघात ठेवण्यास भाग पाडले जाईल, मग विचार करा की त्याच्या संघाचा किती डाउनफॉल होईल.'' पाकिस्तानी नागरिकांनी अनेक अशा गोष्टींवर भाष्य करत पाकची चेष्टा केली आहे