Tuljapur Drugs Case : ड्रग्सवरुन निंबाळकर-राणा आमनेसामने, पालकमंत्री सरनाईकांसमोरच खडाजंगी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजभवानीच्या तुळजापूरमध्ये (Tuljapur) ड्रग्स सापडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे तुळजापूरनंतर भगवंत नगरी बार्शीतही ड्रग्स आढळून आले असून पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे. तुळजापूरमधील ड्रग्सचा मुद्दा सातत्याने गाजत असून राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. त्यातच, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थिती सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्स प्रकरणावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी, खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आले. होय, माझ्या बापाने दूध विकलं, दूध विकण काय गुन्हा आहे का, बापाने दूध (milk) विकल्याचा मला अभिमान आहे. दुध विकलंय, ड्रग्स नाही, असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राणा पाटलांवर संतापल्याचे दिसून आले.