पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठा खुसाला समोर आलाय. पाकिस्तानी सैन्याचे कमांडो दहशतवादी बनून घुसखोरी करतात...सुरक्षा यंत्रणांकडे पाकिस्तानी सैनिकांच्या घुसखोरांमध्ये सहभागी असण्याचे पुरावे सापडलेत. ज्या मुसाचा सुरक्षा दल शोध घेतायत त्या मुसाच्या आधीही पाकिस्तानी सैन्याचा कमांडोंनी दहशतवादी बनून भारतात घुसखोरी केलीय. त्यातले अनेक जण मारले गेलेत. आता पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची कच्चाचिठ्ठा आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
((पहलगाम के विजुअल पर ))
:
पाकिस्तानी टेरर फॅक्ट्रीबद्दल मोठा खुलासा
दहशतवादी बनून घुसखोरी करतात पाकिस्तानी सैन्याचे कमांडो
मुसाच्या आधी पाक कमांडोंनी केलीय घुसखोरी
((मोंटाज.. सुरक्षाबलों का.. जो एनकांउटर करते हैं))
पहलगाम हल्ल्यात ज्या मुसाचा भारतीय सुरक्षा यंत्रणा शोध घेतायत त्या मुसाच्या आधीसुद्धा पाकिस्तानी सैन्यानं आपले कमांडर दहशतवादी बनवून पाठवलेत...
एबीपी नेटवर्कनं पाकिस्तानी सैनिकांच्या मुसा मॉडेवलचा पर्दाफाश केलाय...
दहशतवाद्यांच्या वेशात पाकिस्तानी सैन्य आपले कमांडो पाठवते...
सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानच्या या नापाक कारनाम्यांची कुंडली तयार केलीय...
((फाइल फुटेज कुपवाड़ा वाली ))
हा फोटो गेल्या जुलैमधला आहे...जुलैमध्ये कुपवाडातल्या माछिल सेक्टरमध्ये भारतीय जवानांच्या हातून नोमान जियाउल्लाह मारला गेला...एन्काऊंटरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रंही हस्तगत करण्यात आली...
((नोमान का फोटो))
सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की नोमान पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा कमांडो असू शकेल...एसएसजी कमांडो उमर फारुकसोबत नोमानचे फोटो समोर आलेत...
नोमान पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये राहात होता, जिथं ओसामा बिन लादेनचा अमेरिकेच्या सैनिकांनी खात्मा केला होता. नोमनसुद्धा त्याच्या मित्रासारखाच
एसएसजी कमांडो असेल, ज्याला सीमापार दहशतवादी कारवायांसाठी पाठवलं गेलंय, असा सुुरक्षा यंत्रणांना संशय आहे....
((किश्तवाड़ का फाइल फुटेज))
याच महिन्यात किश्तवाडमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता, तेसुद्धा एसएसजीचे कमांडो असतील असा संशय आहे. भारतीय सैन्याला एन्काऊंटरवेळी दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी सैन्याचे रेडिओ सेटसुद्धा मिळालेत. सोबतच पाकिस्तानात बनलेले सर्जिकल ग्लोव्ह्ज्स, इंजेक्शन आणि औषधसुद्धा मिळाली आहेत.
((जहीर का फोटो))
केवळ कमांडोच नाही तर फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांनाही दहशतवाद पसरवण्यासाठी भारतात पाठवलं जातं.
याचा पुरावा सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलाय. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधला हा फोटो आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये भारतीय सैन्यानं नियंत्रण रेषेवरच्या तंदधार सेक्टरमध्ये घुसखोरीदरम्यान जहीर अहमद अब्बास नावाच्या दहशतवाद्याला कंठस्नान घालं होतं.
जहीर हा रावळपिंडीतल्या सेंट्रल जेलमध्ये होता, असं तपासात समोेर आलंय.
जहीरला एका गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
पण पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयनं जहीरला जेलमधून बाहेर काढलं
आणि त्याला जिहादी बनवलं
त्यानंतर त्याला भारतात दहशतवाद पसररवण्यासाठी पाठवण्यात आलं.
((सोशल मीडिया वाली फोटो))
खुद्द रावळपिंडीच्या जेल अधिकाऱ्यांनी जहीरच्या फाशीच्या शिक्षेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीच्या पुराव्यांना जगासमोर ठेवलं जाईल.
मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या कब्जातून जप्त केलेली पाकिस्तानी सैन्याची उपकरणं आणि सरकारी दस्तावेजसुद्धा जोडीला आहेत...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला कारवाईसाठी खुली सूट दिलीय...तरीही जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी अशा डॉझियरचीसुद्धा गरज असते...
भारतीय लष्करानं गेल्या वर्षी नियंत्रण रेषेवर २० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं
एन्काऊंटरमध्ये २३ दहशतवादी मारले
त्यातले ७० ते ८० दहशतवादी मूळचे पाकिस्तानी होते
११ दहशतवाद्यांचे पाकिस्तानी नागरिकत्वाचे पुरावे लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांकडे आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट आणि इतर भागात जम्मू आणि काश्मीरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या शोकसभेचे फोटोसुद्धा सुरक्षा यंत्रणांकडे आहेत. या सभा पाकिस्तानी पोलिसांच्या सुरक्षेत आयोजित करण्यात आल्या होत्या.
काश्मीर खोऱ्यात जितके दहशतवादी मारले जातात त्यांच्यासाठी रावळकोटमध्ये शोकसभा आयोजित केल्या जातात. आणि जिहादी भाषणं देऊन तरुणांना भडकावलं जातं. सुरक्षा यंत्रणांची अशा सभांवर करडी नजर आहे. आणि अशाच शोकसभांमधून पहलगाम हल्ल्यातल्या गुन्हेगारांचे पुरावे मिळतील, याची शक्यता आहे...