Bandra Fire Updateवांद्रे येथे क्रोमा शोरुमला आग, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक,अग्निशामकदलाचे प्रयत्न
मुंबईत वांद्रे पश्चिममेतील क्रोमा शोरुमला आग लागली आहे. लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलच्या तिसऱ्या माळ्यावर क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम आहे. पहाटे चारच्या सुमारास आग लागली. त्यानंतर ही आग मॉलच्या मजल्यावरही पसरली. लेव्हल फोरची ही आग असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.पहाटेची वेळ असल्याने मॉलमध्ये कुणीही नव्हतं. मात्र आगीत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
वांद्रे पश्चिममेतील लिंकींग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरूमला आग पहाटे चारच्या सुमाराला आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू पहाटेची वेळ असल्याने शोरूममधे कुणीही नव्हतं..मात्र मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक..