पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात होणार चर्चा
अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्धसराव, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या... पाकिस्तानची उडाली भंबेरी
भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यानं पाकिस्तानात पूर, मुझफ्फराबादमधला मोठा परिसर पाण्याखाली,
देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज व्हायरल करून फसवणूक....देशाचं सैन्य मजूबत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल
पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा, भारतासाठी १३० अण्वस्त्रे तयार ठेवलीत, पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती
पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा नऊवर,
कोण म्हणालं, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देणार?, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं भुवया उंचावणारं वक्तव्य, महायुतीच्याच आश्वासनाचा झिरवाळांना विसर
मला विचारल्याशिवाय शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा, उदय सामंत सल्लागार नसल्याचं म्हणत राणेंचा टोला