¡Sorpréndeme!

Asim Munir Connection Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानी लष्करप्रमुखांपर्यंत Special Report

2025-04-26 4 Dailymotion

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे आता समोर आलेत...इतकंच नाही तर हा हल्ल्याचा कट आखण्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांचा थेट सहभाग असल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीय. मुनीर यांच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवरचा भ्याड हल्ला अमलात आणला...त्याचा कट कसा रचला...आणि त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, पाहुयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...


पहलगाम हल्ल्याचे मास्टरमाईंड

आसिम मुनीर
पाकिस्तानी लष्करप्रमुख

सैफुल्लाह कसुरी
लश्कर-ए-तोयबाचाा कमांडर

अबू मुसा
दहशतवादी

इद्रिस शाहीन
दहशतवादी

मोहम्मद नवाज
दहशतवादी

अब्दुल्ला खालिद
दहशतवादी

अब्दुल रफा रसूल
दहशतवादी
GFX OUT

दहशतवाद्याचे हे सात चेहरे...ज्यांच्या इशाऱ्यावर पहलगामच्या 

हिरव्या नंदनवनाला रक्तानं लाल करण्यात आलं...

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांनी केली...

मुनीरच्या त्या प्याद्याची कुंडली आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहेत...

(पहलगाम हल्ल्याचा १० सेकंदाचा मोन्टाज)

२२ एप्रिल २०२५ ची ही दृश्यं पाहून सारा देश संतापानं धुमसतोय...

पाकिस्तानात घुसून कारवाई करण्याची मागणी होतेय...

भारतानं सीमेवर दहशतवाद्यांविरोधात अंतिम प्रहार करण्याची तयारी केलीय...

हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानी लष्करुप्रमुख मुनीर आता लपण्याची ठिकाणं शोधतायत...

PTC IN
सूत्रांच्या माहितीनुसार आसिफ मुनीरसह पाकिस्तानी लष्कराच्या टॉप अधिकाऱ्यांनी 
आपल्या कुटुंबीयांना परदेशात पाठवलंय...खासगी विमानानं त्यांना इंग्लंड, आणी न्यजर्सीकडे रवाना करण्यात आलंय. भारताकडून करारा जवाब मिळण्याच्या भीतीनं पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांची ङाबरगुंडी उडालीय...
PTC OUT

VO
तो आसिफ मुनीरच होता ज्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सहा दिवस आधी दहशतवाद्यांना ग्रीन सिग्नल दिला होता...

(ग्राफिक्सवर १६ एप्रिल २०२५)

१६ एप्रिललाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ट्रिगर पॉईंट इस्लामाबादमधून दाबला गेला...

इस्लामाबादमध्ये आयोजित ओवरसीज पाकिस्तानी संमेलनात आसिफ मुनीरनी 

कट्टरवादावर लेक्चर झाडलं...

((UNMIX 830 maulana muneer PoK pkg 17042025 KN
बाइट- आसिम मुनीर, पाकिस्तानी आर्मी चीफ
कश्मीर पर हमारा और सरकार का रुख साफ है, कश्मीर हमारे गले की नस थी, नस है और रहेगी, हम इसे नहीं भूलेंगे))

VO
आसिफ मुनीरनं दबक्या आवाजात जे म्हटलं तेच त्याचे हँडलर आणि पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसुरीनं जाहीररित्या म्हटलं होतं...

bYTE
((सैफुल्लाह कसूरी, आतंकवादी
भाइयों कश्मीर बहुत जल्द इंशाअल्लाह- इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
का कश्मीर बनने वाला है बहुत जल्द बनने वाला है 
मैं लिखकर ये बात कह रहा हूं.. बहुत जल्द आप देखेंगे... कश्मीर ला इलाहा इल्लल्लाह की जागीर होगी... कश्मीर ला इलाहा इल्लल्लाह की जमीन है))

VO
पहलगामच्या रक्तरंजित कटाला मूर्त स्वरूप देणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी 
सैफुल्ला कसुरीच होता...ज्यानं हिंदूंना टार्गेट करून हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता...

VO
१९ फेब्रुवारचे फोटो दहशतवादी सैफुल्ला कसुरी आणि पाकिस्तानी रेंजर्सचे विंग कमांडर जाहिद जरीनचे आहेत...

((scene in))
सूत्रांच्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या या बैठकीनंतर कसुरीनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या कसूर शहरात पोहोचला...
जिथं त्यानं फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अबू मुला, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिदसोबत बैठक घेतली...
((scene out))

VO
याच बैठकीत पहलगाम हल्ल्याचा कट शिजवण्यात आला...

आणि २२ तारखेला सीमा ओलांडून आलेल्या दहशतवाद्यांनी त्याला अंतिम स्वरूप दिलं...

त्या दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानातच आहेत, हे जगजाहीर झालंय...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं त्या आकांना कायमची अद्दल घडवावी लागेल...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...