¡Sorpréndeme!

Pahelgam Attack : भारताकडून जलकोंडी, सिंधूचं पाणी रोखणार, पाकिस्तानची जिरवणार Special Report

2025-04-26 18 Dailymotion

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे धडधडीत पुरावे समोर आले...आणि भारतानं आजवर केली नसलेली कडक कारवाई पाकिस्तानवर गेली...सिंधू नदीचा जलकरार रद्द करण्याचा निर्णय घेऊन भारतानं पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी आणलंय...याच्या संभाव्य परिणामांची जाणीव असलेली पाकिस्तानी सरकार आणि तिथले नेते आता हादरून गेलेत...आणि त्यांना भारताला धमक्या द्यायला सुरुवात केलीय...पाहुया याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट..




पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला...

या हल्ल्यामागे असणाऱ्या नापाक पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारतानं पहिलं पाऊल उचललं...

पाकिस्तानला जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखून पाकिस्तानचा घसा कोरडा करण्याचा प्लॅन भारतानं आखलाय...

भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीय...

पाणी रोखल्यास रक्ताचा सडा पडेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या बिलावल भु्ट्टोनं केलीय...


((सिंधु नदी में या तो हमारा पानी बहेगा, या फिर उनका खून बहेगा। सिंधु दरिया हमारा है और हमारा ही रहेगा।))


भारताचा मोठा शत्रू, लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदनंही सिंधूच्या पाण्यावरून भारताला धमकी दिलीय...




पाकिस्तानची पाणीकोंडी करण्यासाठी भारतानं तीन टप्प्यांची रणनीती आखलीय...

त्याचं प्रेझेंटेशन जलशक्ती मंत्रालयानं शुक्रवारी केलं...

सिंधू पाणीवाटप करारातल्या नद्यांवरच्या धरणांची उंची वाढवणार

नद्यांचं पाणी इतरत्र वळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार

नद्यांवरच्या धरणांतला गाळ काढून साठवण क्षमता वाढवणार

सिंधू नदीच्या पाण्यावरून आधीच पाकिस्तानमधल्या सिंध आणि पंजाब प्रांतात जुंपलीय...

सिंध प्रांत अधिकच्या पाण्याचा उपसा करत असल्याबद्दल पंजाब प्रांतानं नाराजी व्यक्त केलीय...

अशातच भारतानं पाणी रोखल्यास पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार आहे...


सिंधू नदी प्रणालीच्या ६ नद्या दोन भागांत विभागल्या गेल्यात...

पूर्वेकडच्या नद्या - सतलज, बियास आणि रावी या भारतासाठी

पश्चिमेकडेच्या नद्या - सिंधू, झेलम आणि चिनाब या पाकिस्तानसाठी 

पण भारत पश्चिमेकडच्या नद्यांच्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी आणि शेतीसाठी मर्यादित वापर करू शकतो...

सिंधू जलकराराचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला होतो...

सिंधू जलप्रणालीच्या एकूण पाण्यापैकी ७० टक्के पाणी पाकिस्तानला तर ३० टक्के पाणी भारताला मिळतं...

सिंधू नदीचं पाणी भारतानं रोखल्यास पाकिस्तानच्या ९० टक्के म्हणजेच ४.७ कोटी शेतीला फटका बसेल 

पाकिस्तानच्या मंगल आणि तरबेला जलविद्युत धरणांचं पाणी आटेल

पाकिस्तानचं वीज उत्पादन ३०% ते ५०% कमी होऊ शकतं. 

त्यामुळेच केवळ पाकिस्तान सरकारच नव्हे तर पाकिस्तानी नागरिकसुद्धा मुळापासून हादरलेत...

आधीच भिकेकंगाल असणाऱ्या पाकिस्तानवर शेतीच कोरडी पडल्यानं उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे...

आजवर पाकिस्तान भारतावर अनेक युद्धं लादली...

अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले...

पण सिंधू जलकरार रद्द करण्याचं अस्त्र भारतानं कधीच उगारलं नव्हतं...

पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी सरकारनं आतापर्यंतचा सर्वात आक्रमक पवित्रा घेतलाय...

भारताचा हा पवित्रा म्हणजे युद्धाला चिथावणी समजली जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्ताननं केलीय...

भारताच्या या भूमिकेविरोधात पाकिस्तान जगभरातल्या देशांची दारं ठोठावण्याची शक्यता आहे...

पण यावेळी दहशतवाद्यांची किंवा त्यांच्या आकाची गय केली जाणार नाही, असा खरमरीत इशारा पंतप्रधान मोदींनी जगाला समजेल अशा भाषेत दिलाय...


भारताच्या संयमाची प्रतीक्षा पाहणाऱ्या पाकिस्तानवर आता हिशेब देण्याची वेळ आलीय...

पाकिस्तानविरोधात कोणत्याही लष्करी कारवाईचं पाऊल उचलण्याआधी भारतानं त्याचा श्वास रोखण्याचा निर्णय घेतलाय...

पाकिस्तान यानंतर ताळ्यावर येणार का, आणि नाही आला तर त्याला अद्दल घडवण्यासाठी भारत कोणतं मोठं पाऊल उचलणार याकडे सगळ्याचं लागलंय...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...