¡Sorpréndeme!

Sudarshan Hasabnis Majha Katta : पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा? ले.जनरल सुदर्शन हसबनीस माझा कट्ट्यावर

2025-04-26 1 Dailymotion

स्वर्ग नेमका कसा असेल याची कल्पना करत असताना डोळ्यांसमोर कश्मीर येत. पण त्याच काश्मीर मध्ये दहशतवादी हिंसाचाराने आकाशाला सुद्धा भेदून. असा आक्रोश झाला, देश हेलावला आणि त्यामुळे चर्चेत आला तो भारताच्या सुरक्षेचा मुद्दा. सेनादलाची दहशतवाद विरोधी ऑपरेशन सुद्धा बातम्यांमध्ये झळकू लागली. ही सुरक्षा व्यवस्था नेमकी आहे तरी कशी? वेगवेगळे ऑपरेशन कसे राबवले जातात. आपले जवान प्राण तळ हातावरती घेऊन कसे काय लढतात? या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आज माझा कट्ट्यावरती आले आहेत. भारतीय सेना दलाचे निवृत्त उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस सर

(AI Generate )

हशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.