¡Sorpréndeme!

100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 26 April 2025

2025-04-26 0 Dailymotion

महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती, राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक पण फक्त ५१ लोकांकडून वैध व्हिसा आणि कागदपत्रं...




पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर, सारे दहशतवादी करत होते लश्कर-ए-तोएबाचं काम, पुलवामा,कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई...


पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोधमोहिम, दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात

पाकिस्ताननं हवाईबंदी घातल्यानंतर डीजीसीएकडून नव्या गाइडलाइन्स जारी, प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना, आठवड्याला ८०० अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून...




पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मिरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर, पर्यटनस्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस..

मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ, लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात पाच कमांडर्सनी रचला कट, पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे




पाकिस्तानच्या आयएसआयकडून जम्मू-काश्मिरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती, भारतीय रेल्वे,काश्मिरी पंडित निशाण्यावर, जम्मू-काश्मिरच्या उत्तर,मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी...


पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची मदत, आदिल हुसेन शाहचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू, आदिलमुळं वाचले अनेक पर्यटकांचे प्राण...




वेळ आलीय एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे...उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट, राज-उद्धव यांच्या साद-प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न...




बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, दहावीचा निकाल मे च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न, पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार...




भिवंडीच्या राहणाल गावात फर्निचर गोदामाला आग... सात ते आठ गोदाम जळून खाक...आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच...

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात गणेश याग, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात..




पश्चिम रेल्वेवर आज दुपारी १ ते उद्या रात्री १२ पर्यंत मेगा ब्लॉक, ३५ तासांच्या मेगाब्लॉकमुळं लोकलच्या १६३ फेऱ्या रद्द..मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी ८ ते दुपारी साडे बारापर्यंत मेगाब्लॉक...