Nashik Family on Pahalgam Terror Attack : 2 मिनिटांच्या मॅगीने वाचवला नाशिकरांचा जीव
Nashik Family on Pahalgam Terror Attack : 2 मिनिटांच्या मॅगीने वाचवला नाशिकरांचा जीव
पहलगाम ला गेलेल्या नाशिकच्या पर्यटकांनी थराराक अनुभव एबीपी माझाकडे कथन केला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी नाशिकचे पर्यटक त्याच ठिकाणी होते. नौदल अधिकारी विनय नरवाल त्याच्याच बाजूने पुढे गेलेत आणि त्यांना गोळ्या झाडल्या। गोळीबार सुरू झाल्यानंतर सर्व सैरभैर झालेत. दोन जन दफन हो गये असे तिथले स्थानिक लोक बोलू लागले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. यांच्यां बरोबर असणाऱ्या महिलाच्या अंगावरील दागीने, कपाळावरील सौभाग्य चे लेण असणारी टिकली काढायला लावली, डोळ्यांत सुरमा घालून बुरखा सारखा पेहराव महिलांना करायला सांगितला तसेच कोणी नाव विचारले तर हिंदु नाव सांगू नका आशा सूचना ही केल्याची माहिती या पर्यटकांनी दिली त्याच्या बरोबर असणाऱ्या महिला अद्यापही या धक्यातून सावरल्या नसून आजारी पडला आहेत. त्यामुळे आता पुन्हा कशीमर ला फिरण्यासाठी जाणार नाही असा निर्धार नाशिकच्या पर्यटकांनी केला आहे. केवळ मॅगी खात असल्याने त्याचे प्राण वाचले, एकदा मॅगी घेतली ती आवडली म्हणून पुन्हा मॅगी खायला घेतल्यानं आम्ही तिथेच थांबलो आणि त्यानंतर पुढे जाणार होतो, मात्र दहशतवादी हल्ला झल्यानं माघारी फिरले आणि त्याचे प्राण थोडक्यात वाचले यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी