¡Sorpréndeme!

उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा; छावा क्रांतीवीर सेनेची मागणी

2025-04-25 22 Dailymotion

अहिल्यानगर (शिर्डी) : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेनं शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीतून मोर्चा काढला. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या आणि कर्जमाफी नाकारणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचा मालक न होता, त्यांचा कैवारी व्हावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा," अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केली.