¡Sorpréndeme!

ABP Majha Headlines 1:00 PM 25 April 2025 Maharashtra News दुपारी 1:00 च्या हेडलाईन्स

2025-04-25 1 Dailymotion

ABP Majha Headlines 1:00 PM 25 April 2025 Maharashtra News दुपारी 1:00 च्या हेडलाईन्स

एरवी गजबजलेल्या बैसरनच्या विस्तीर्ण मैदानात शुकशुकाट, दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीतून माझाचा 'ग्राऊंड झिरो रिपोर्ट'

पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी असिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त, असिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर...श्रीनगरमध्ये १५ व्या कोअर कमांडरनी लष्करप्रमुखांना दिली सद्य परिस्थितीची माहिती, पहलगामलाही जाण्याची शक्यता..

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल, आर्मी रुग्णालयात घेणार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट

छत्तीसगडमध्ये चकमकीत पाच नक्षलवादी ठार, तीन राज्यांच्या २० हजार सुरक्षा दलाच्या जवानांनी शेकडो नक्षलवाद्यांना घेरले..

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित, यापुढं बेजबाबदार वक्तव्यं कराल तर आम्हीच स्वतःहून दखल घेऊ असा इशारा...