¡Sorpréndeme!

Pahalgam Residents on Attack : अन्नही जात नाहीए,आम्हीही रडतोय! पहलगामच्या नागरिकांच्या मनात काय?

2025-04-24 2 Dailymotion

Pahalgam Residents on Attack : अन्नही जात नाहीए,आम्हीही रडतोय! पहलगामच्या नागरिकांच्या मनात काय?

पहलगाम येथील दहशतवादी (Terrror) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील या बैठकीला हजर होते. या बैठकीत वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेऊन घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानची (Pakistan) पूर्णत: कोंडी करण्यात आली आहे. 

लष्कर आणि संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांना पूर्ण ब्रिफिंग करण्यात आले. त्यानंतर, अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पराराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्ताविरोधात 5 मोठे निर्णय घेत 5 तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे.