¡Sorpréndeme!

Pahalgam Terror Attack Effect on Kashmir Tourism : पर्यटकांवर गोळीबार, पर्यटनाला जखम Special Report

2025-04-23 40 Dailymotion

पर्यटन हा काश्मीरचा प्राण...तो प्राणच काढून घेण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केलाय...दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला...आणि काश्मीरच्या पर्यटनावरच कुऱ्हाड पडली...त्याच्या भीषण परिणामांची जाणीव काश्मीरमधल्या स्थानिक व्यावसायिकांना आहे...पर्यटकांशिवाय आपलं भवितव्य कसं असेल याची चिंता त्यांना पडलीय...पाहुयात काश्मीरमधल्या पर्यटनाबाबतचा हा ग्राऊंड रिपोर्ट...

जर पृथ्वीवर स्वर्ग असेल तर ते हेच आहे, हेच आहे, हेच आहे...

शेकडो वर्षांपासून काश्मीरचं हे असं वर्णन केलं जातं...

तेच काश्मीर गेली काही दशकं दहशतवादाच्या आगीत होरपळपत होतं...

आणि आता आता पर्यटकांनी फुलू लागलं होतं...

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगामची ओळख तर मिनी स्वित्झर्लंड अशीच...

घनदाट देवदार, पाईन वृक्षांचं जंगल, चहुबाजूंनी बर्फाच्छादित डोंगर...

पर्यटकांसाठी नंदनवनच...

पण मंगळवारी पाकिस्ताननं पोसलेल्या दहशतवाद्यांनी पृथ्वीवरच्या या स्वर्गाला पुन्हा एकदा नरकयातना दिल्यात...

अवघ्या एक दिवसांपूर्वी देशभरातल्या पर्यटकांनी काश्मीर फुललं होतं...

पण पहलगाममध्ये आनंदाची लयलूट करणाऱ्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला...

आणि काश्मीरचं सगळंच चित्र पालटलं...

पहलगाममधल्या हल्ल्यानंतर घाबरलेले पर्यटक आता काश्मीर सोडून जातायत...

एरवी गजबजलेल्या श्रीनगरमधल्या दल लेकवर आता असा शुकशुकाट आहे...

पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं दल लेकमधले शिकारे जागीच उभे आहेत...

अतिरेक्यांनी केवळ पर्यटकांवरच नाही तर काश्मीरच्या पर्यटनावरच गोळी चालवलीय,  अशी तिथल्या व्यावसायिकांची भावना आहे...

काश्मीरमधल्या सगळ्याच पर्यटनस्थळांवर अशीच स्मशान शांतता पसरलीय...

केवळ पर्यटन हेच रोजी रोटीचं साधन असलेल्या स्थानिक व्यावसायिकांच्याच पोटालाच अतिरेक्यांनी नख लावलंय...

पर्यटकांच्या मृत्यूचं दु:ख आणि स्वत:च्या भविष्याचा अंधकार त्यांना सतावतोय...