¡Sorpréndeme!

Pahalgam Terror Attack : वेळेत घोडे मिळाले नाहीत अन्...! Kolhapur करांची थरारक कहाणी Special Report

2025-04-23 3 Dailymotion

Pahalgam Terror Attack : पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याठिकाणी हल्ल्याच्या काही तास आधी कोल्हापुरातील तीन कुटुंब होती. सुदैवाने ही कुटुंब दहशतवादी हल्ल्यातून वाचले आहेत. पहलगामला गेलेले पर्यटक काल रात्री कोल्हापुरात दाखल झाले. ही घटना समजल्यानंतर आज सकाळपर्यंत पाहुण्यांचे फोन येत होते. घरातील सदस्य घाबरून गेले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असून आता सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे.

वेळेत घोडे मिळाली नाहीत अन्..

वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला होता. पहलगामपासून दीड किलोमीटर मागे असतानाच दहशतवाही हल्ला सुरु झाला होता. ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच  अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी माघारी परतले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत.