¡Sorpréndeme!

Pahalgam Terror Attack : दिलीप देसलेंचं पार्थिव पनवेलमध्ये आणलं ABP Majha

2025-04-23 0 Dailymotion

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा निष्पाप बळी गेला.. या मृतांपैकी डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोनेंच पार्थिव मुंबईत विशेष विमानाने आणण्यात आलं.. या तिन्ही मावस भावांच्या पार्थिव डोंबिवलीमधील भाग शाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.. तर पनवेलचे दिलीप देसले यांचंही पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलंय.. दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या मृत्यूमुळे खांदा कॉलनीत शोककळा पसरलीय.. तसंच पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव रात्री उशीरा पुण्यात दाखल होणार आहे...

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिघांना प्राण गमवावे लागले.. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांमधला जिव्हाळा नातेवाईकांमध्ये नेहमीच कौतुकांचा विषय असायचा..लेकरांची परीक्षा संपली म्हणून ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते.. मात्र बैसरनच्या खोऱ्यात त्यांची गाठ माणसाच्या मुखवट्याड दडलेल्या सैतानांशी पडली..