¡Sorpréndeme!

Pahalgam Terror Attack Superfast News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बातमी ABP Majha

2025-04-23 0 Dailymotion

Pahalgam Terror Attack Superfast News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बातमी ABP Majha 

दहशतवादी हल्ल्यात मृत दिलीप देसले, संजय लेलेंचे पार्थिव मुंबईत आणलं, संजय लेलेंचं पार्थिव डोंबिवलीत नेलं जाणार.

दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पनवेलच्या दिलीप देसलेंवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांकडून श्रद्धांजली अर्पण.

डोंबिवलीतील मृत पर्यटक हेमंत जोशी आणि अतुल मोनेंचं पार्थिव मुंबईत दाखल, दुसऱ्या विशेष विमानाने मुंबईत आणलं पार्थिव.

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळेंचं पार्थिव आज संध्याकाळी पोहोचणार. विशेष विमानाने गणबोटे, जगदाळे यांचं पार्थिव दाखल होणार.  

पहलगाममध्ये दहशतावीद हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू, त्यांच्या मृत्यूचं वृत्त कळाल्यानंतर गणबोटेंच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर.

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात भाजपची निदर्शनं, काळया पट्ट्या बांधत केला घटनेचा निषेध, गणबोटे कुटुंबातील नातेवाईक आंदोलनात सहभागी.

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांना दिल्ली विमानतळावर नौदलाकडून मानवंदना, हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवालांचं सात दिवसांपूर्वी लग्न झालं होतं,