बुलढाणा : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळं बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचला आहे. मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात 28 जणांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील पाचजण पहलगाममध्ये अडकले आहेत. मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा बुलढाण्यातील पाचजण तिथल्या हॉटेलमध्ये होते. हे पाचजण हॉटेलबाहेर पडणार होते तेव्हा, हॉटेल मालकानं "बाहेर फायरिंग सुरू आहे. त्यामुळं बाहेर पडू नका" असं सांगितलं. बुलढाण्यातील जैन कुटुंब फिरायला जम्मू काश्मीरला गेलं होतं. जेव्हा फायरिंग सुरू होती तेव्हा, जैन कुटुंबातील पाच सदस्य हॉटेलमध्ये होते. सध्या जैन कुटुंब हॉटेलमध्येच आश्रयला आहे. सध्या हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच ते परततील.