¡Sorpréndeme!

Pahalgam Terror Attack : Vinay Narwal यांना मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न..

2025-04-23 0 Dailymotion

मुंबई : पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात (Terror attack) 27 भारतीय पर्टटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवाद्यांना सोडणार नाही, अशा शब्दात इशारा दिलाय. तर, अमित शाह यांनी पहलगाम (Pahalgam) येथे भेट देऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यात, नेव्हीतील (Navy) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वीरगती प्राप्त झाली असून त्यांना नौदलाकडून आज मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीने जय हिंद म्हणत श्रद्धांजली वाहिली, तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात कालवलं. 

भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद... असे म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर 7 दिवसांच्या विधवेनं टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.