¡Sorpréndeme!

Pahalgam Terror Attack : सहा पतींना पत्नींच्या समोरच गोळ्या मारल्या; अतिरेक्यांचा रक्तरंजित खेळ

2025-04-23 9 Dailymotion

हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवालांचं सात दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनला गेले होते. भेळपुरी खाताना अतिरेक्यांनी धर्म विचारुन विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या. 

दहशतवाद्यांनी उ.प्रदेशातल्या शुभम द्विवेदीलाही पत्नीसमोर गोळ्या घातल्या.  शुभम कुटुंबीयांसह ११ दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेला होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडल्या. मलाही गोळ्या घाला असं त्याची पत्नी एशान्या म्हणत होती. मात्र हम आप को मारेंगे नहीं, आप सरकार को जाकर बताओ, असं उत्तर अतिरेक्यांनी दिलं.

इंदूरच्या सुशील नथानियल यांना देखील अतिरेक्यांनी कुटुंबीयांसमोर गोळ्या घातल्या. नथानियल यांची मुलगी आकांक्षाही गोळीबारात जखमी झाली आहे. सुशील नथानियल हे पत्नी, मुलगा, मुलीसह चार दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेले होते. पण तिथेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

रायपूरच्या एका उद्योगपतीला लग्नाच्या वाढदिवसालाच दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या. रायपूरच्या दिनेश मिरानियांना दहशतवाद्यांनी पत्नीसोबत फोटो काढताना गोळ्या घातल्या. पत्नी, मुलगा, मुलीसमोर दिनेश मिरानियांची अतिरेक्यांनी हत्या केली.

बिहारच्या मनीष रंजन यांचीही कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पत्नी आशादेवी आणि दोन मुलांसमोर मनीष यांना गोळ्या घालण्यात आल्या. पत्नी आणि दोन्ही मुलं सुरक्षित आहेत. मनीष रंजन हे आयबी ऑफिसर आणि हैदराबादेत सेक्शन ऑफिसर आहेत.

अतिरेक्यांनी भावनगरच्या पिता-पुत्राला आणि मित्राला गोळ्या घातल्या. गुजरातचा २० जणांचा ग्रुप काश्मीरला सहलीला गेला होता. यतीशभाई आणि त्यांचा मुलगा स्मित यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांनी यतीशभाई आणि स्मितची हत्या केली आणि पत्नी काजलबेनला सोडले.