Pahalgam Spot Report : ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी ABP माझा!घटनास्थळावरुन आढावा
संपूर्ण जागाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावणारे भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. यात अनेक निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यात महाराष्ट्रतील 6 निष्पाप पर्यटकांचा ही मृत्यू झाला आहे.
अशातच, नागपूरचे (Nagpur) पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या सात सदस्य कुटुंबीयांसह सध्या काश्मीरमध्ये असून श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. विशेष म्हणजे पहलगाममध्ये ज्या ठिकाणी काल भ्याड दहशतवादी हल्ला झाला, दोनच दिवसांपूर्वी पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या कुटुंबीयांसह त्याच पर्यटन स्थळावर उपस्थित होते. तेव्हा परिस्थिती एकदम शांत होती. मात्र कालपासून (22 एप्रिल) परिस्थिती अत्यंत तणावाची झाली आहे. काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी सुरक्षा दल दिसत आहे. आकाशात हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि विमानांची सतत टेहळणी सुरू असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज वाघमारे यांनी एबीपी माझाशी व्हिडिओ कॉल वर श्रीनगर मधून बोलताना दिली आहे.