Chandrakant Patil : मी सिनिअर मंत्री,फक्त गृहमंत्री व्हायचं राहिलंय,चंद्रकांतदादांचं वक्तव्य
मी राज्यातील सिनिअर मंत्री आहे. आतापर्यंत जवळपास सर्व मंत्रीपदे मी भूषवली आहेत. 'गृहमंत्री' व्हायचं फक्त राहिले आहे, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेय. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाकडे अनेक अर्थाने पाहिले जाते आहे. तासगाव येथे तासगाव येथे शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेले दुर्गामाता मंदिर प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते