Pahlgam Attack Update : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन जखमींचाही मृत्यू
म्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पल्लवी म्हणाली की, मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका...यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा...ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असं दहशतवादीने सांगितले, असं पल्लवी यांनी सांगितले.
मंजुनाथ अन् पल्लवीचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.