¡Sorpréndeme!

Sanjay Raut Full PC : उद्धव ठाकरे सकारात्मक, राज ठाकरे माझे मित्र; चर्चा करुन निर्णय घेणार!ABP MAJHA

2025-04-22 2 Dailymotion

Sanjay Raut Full PC : उद्धव ठाकरे सकारात्मक, राज ठाकरे माझे मित्र; चर्चा करुन निर्णय घेणार!ABP MAJHA

: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघा बंधूंनी पुन्हा एकत्र यावं, अशा चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहेत. यावर दोन्ही पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी "ठाकरे बंधूंनी एकत्र यावं" असे बॅनर्स झळकले आहेत. मात्र, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, आणि चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र युतीविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरे गटातील युतीचा विषय अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर कोणीही सार्वजनिकरित्या बोलू नये," अशा सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं भाष्य केलंय. 

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी हात पुढे केला आहे आणि त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. आपण येथेच थांबायला हवे. काही दिवस जाऊ द्या. मनसे प्रमुख मुंबईत नाहीत. त्यांना मुंबईत येऊ द्या. त्यानंतर आपण सगळे चर्चा करू. रोज यावर चर्चा करून त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे? लोकांच्या मनातल्या भावना आहेत. हा विषय जिवंतच राहणार आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीने चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचे नाते काय? हे मला माहित आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. आपल्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचे आहे त्यांनी यावे. रिपब्लिकन गटाचे नेतेदेखील एक होण्याच्या विचारात आहेत, असे त्यांनी म्हटले.