Pope Francis Passes Away :पोप फ्रान्सिस यांचं 88व्या वर्षी निधन,व्हॅटिकनमध्ये घेतला अखेरचा श्वास
पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू आहेत जे 2013 मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप बनले. ते पोप बेनेडिक्ट यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले. पोप फ्रान्सिस हे गेल्या 1000 वर्षांतील पहिले व्यक्ती आहेत जे नॉन-युरोपियन असूनही कॅथलिक धर्मातील सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. पोप यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनातील फ्लोरेस शहरात झाला. पोप यांनी आपले बहुतेक आयुष्य अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये व्यतीत केले आहे. सोसायटी ऑफ जीझस (जेसुइट्स) चे सदस्य असणारे आणि अमेरिकन खंडातून आलेले ते पहिले पोप आहेत. त्यांनी ब्युनोस आयर्स विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली होती.