¡Sorpréndeme!

Uddhav - Raj Thackeray : राज ठाकरे - उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ

2025-04-20 0 Dailymotion

एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दुसरीकडे मनसेतल्या नेत्यांची विधानं पाहता या युतीबाबत मनसेत फारशी अनुकुलता नाही का असा सवाल उपस्थित झालाय. भोंगेविरोधातल्या आंदोलनात मनसैनिकांवर १७ हजार केसेस टाकल्या मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय. २०१७ मध्ये युतीच्या प्रयत्नात दगा कोणी दिला हे सर्वांना माहितीय असंही ते म्हणाले.  

महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत राहणाराही महाराष्ट्राचा शत्रूच असल्याचं विधान ठाकरेंच्या िवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय...मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं राऊत म्हणालेत...तर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत...दोन भावांची सहमती होतेय त्यात वादविवाद करणं योग्य नाही, असा सल्लादेखील राऊतांनी दिलाय...

मनसे आणि शिवसेना युतीबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीये...राज ठाकरे सेना सोडणार हे कळाल्यानंतर मी दोघांनाही फोन करून शांत राहण्याची विनंती केली मात्र व्हायचं ते झालं, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली...तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकेंची युती झाल्यास शक्ती वाढेल असं भुजबळ म्हणालेत...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांचा बोलण्यास नकार 

शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर 

दौऱ्यावर ठाकरे बंधूंबाबत विचारलेला प्रश्न पवारांनी टाळला 

राज ठाकरेंना अटीशर्ती घालून नमवणं सोपं नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी दिलीये...अटीशर्ती घालून झुकणारे नेते नाहीत असंही ते म्हणालेत...