एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दुसरीकडे मनसेतल्या नेत्यांची विधानं पाहता या युतीबाबत मनसेत फारशी अनुकुलता नाही का असा सवाल उपस्थित झालाय. भोंगेविरोधातल्या आंदोलनात मनसैनिकांवर १७ हजार केसेस टाकल्या मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय. २०१७ मध्ये युतीच्या प्रयत्नात दगा कोणी दिला हे सर्वांना माहितीय असंही ते म्हणाले.
2017 साली मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलेले, मात्र ठाकरे वरच्या मजल्यावरुन तळमजल्यावर सुद्धा आले नाहीत, मनसे नेते संदीप देशपांडेंची मनसे शिवसेना युतीवर प्रतिक्रिया
महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य, निवडणुका येतात, जातात, पण फक्त एखादा विषय निवडणुकापुरता येणं करंटेपणा, देशपांडेंची प्रतिक्रिया
संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना हिंदी सक्तीसंदर्भात पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.