¡Sorpréndeme!

Sanjay Raut Full PC : Raj Thackeray - Uddhav Thackeray युतीच्या सिनेमाचं शूटिंगसुरु आहे

2025-04-20 1 Dailymotion

Sanjay Raut on Raj Thackeray & Uddhav Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. अलीकडेच, या चर्चेला नवे बळ मिळाले आहे. कारण दोघांनीही याबाबत एकेक पाऊल पुढे टाकले आहे. एका मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनीही तत्काळ त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलंय.  

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आहे. आता यात अटीशर्ती वगैरे कुठे आलेल्या नाही. दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयावर त्यांची सहमती होत असेल तर त्यात फार वादविवाद करणे योग्य नाही. या मताचा माझासारखा माणूस सुद्धा आहे. यात अटी आणि शर्ती कोणत्याच नाही.