¡Sorpréndeme!

Tanisha Bhise death case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल

2025-04-20 3 Dailymotion

पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी (Tanisha Bhishe Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आयुक्ताना ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 

ससूनच्या अहवालामध्ये डॉ. घैसास यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरुन आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तनिषा भिसे यांना चार तास ताटकळत ठेऊन त्यांच्यावर उपचार केला नाही. त्यामुळे पुढची परिस्थिती उद्भवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. डॉ. घैसास यांनी या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

डॉक्टर सुश्रुत घैसास यांचेवर पोलिस योग्य ती कारवाई करतील असं पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले. या प्रकरणात डॉ. घैसास यांची भूमिका निष्पण झाली आहे. त्या आधारे हा गुन्हा दाखल केरण्यात आल्याचं पोलिस उपायुक्तांनी सांगितलं.