महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिलेत. त्याहीपुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले...महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती...राज यांची मुलाखत प्रसारित अवघ्या काही तासांतच एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी य़ावर उत्तर दिलं...आपल्याकडून भांडणं नव्हती, मराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली..भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला बसणार नाही, याचा निर्णय घ्या, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं...
ठाकरे बंधूंचे साद प्रतिसाद, दोन्ही पक्षात घडामोडींना वेग
मनसेत संभाव्य युतीबाबत नाराजीचे वारे?
अभद्र युती होऊ नये ही ईश्वर चरणी प्रार्थना- खोपकर
निवडणुकीपूर्वी एकत्र येणं संकुचित विचार- देशपांडे