ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर हँडलवर ठाकरे बंधुंचा एकत्र व्हिडीओ शेअर, मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार, अशा आशयाचा मजकूर लिहीत व्हिडीओ पोस्ट.
राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावचं लागेल, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे आता पवारांना धोका देण्याच्या तयारीत, धोका देणाऱ्यांवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा?, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल.
मनसे नेते अमेय खोपकरांकडून शिवसेना-मनसे युती होण्यावर नाराजी, अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, खोपकरांची एक्स पोस्ट.
कुटुंबातून दूर गेलेले एकत्र आले तर आनंदच, गैरसमजामुळे ठाकरे बंधूंची युती होत नाही, राज-उद्धव एकत्र आले तर मराठी माणसाचं चांगलंच होईल, राज ठाकरेंच्या चंदू मामांची प्रतिक्रिया.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर काही वाईट नाही, फडणवीसांचं वक्तव्य.
मराठी माणसाचं हित जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस भक्कम, राज्याच्या हितासाठी भांडण सोडवत असाल तर ठीक, भाजप नेते प्रवीण दरेकरांची खोचक टीका.
शिवसेना आणि मनसेला दोन्ही पक्ष आपलेसे वाटतात, राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया, प्रत्येकाने आपल्या विवेक बुद्धीला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, अजित पवारांचं मत.
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील, तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासातला सोनेरी दिवस, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.