Uddhav Thackeray Speech : आज सांगतो, भांडण मिटलं, राज ठाकरेंचीऑफर स्वीकारली? उद्धव ठाकरे UNCUT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि.19) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही ऑफर स्वीकारण्यास होकार दिलाय. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली आहे. उद्धव ठाकरे कामगार सेनेतील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी कोणती अट ठेवलीये? जाणून घेऊयात...
उद्धव ठाकरे म्हणाले, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे...प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे...खूप जणांना काही देता नाही आला तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले...आज सुद्धा कायदे आणलेत कामगारांचे त्याला विरोध केलाच पाहिजे...पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो.