सातारा : नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्�" /> सातारा : नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्�"/>
सातारा : नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात दाखवलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एआय तंत्रज्ञानावरील भाषण आणि शिवसेनेवर टीका करण्यात आलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. "स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळं आपण लोकांच्या मनातून उतरलोय. त्यामुळं आपलं कुणी ऐकत नाही. कुणी थांबायला तयार नाही, म्हणून नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुखांचा नकली आवाज काढण्याचं पाप उबाठानं केलं. स्वतःचं पाप झाकण्यासाठी असा पोरकटपणा उबाठानं केला. बाळासाहेबांचा आवाज राज्यात आणि देशात दुमदुमत होता. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव कालही होता. आजही आहे आणि उद्याही राहील. कारण, तो विचारधारेचा आवाज होता. नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कोणालाही मिटवता आणि फिरवता येणार नाहीत. 'गर्व से कहो हम हिंदू है', हा हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी देशभर रूजवला. त्यांचे वारसदार म्हणून पुढं आलेल्या लोकांना तो विचार पेलवला नाही. त्यामुळं हिऱ्यापोटी गारगोटी, ही म्हण खरी ठरली."