Beed Crime : रक्त साकळलं,शरीर काळंनिळं पडलं; क्रूरतेचा कहर! बीडमध्ये महिलेला मारहाण
अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना गावच्या सरपंच सह दहा जणांकडून मारहाण करण्यात आली होती.याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करत दिली होती गावात असलेल्या मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्याहून हवाच सुरू झाला होता. यानंतर या आवाजाबाबत ॲड. ज्ञानेश्वरी अंजान यांनी पोलिसांना सांगितले. याचाच राग मनात धरून सरपंचासह दहा जणांनी त्यांना शेतात गाठून मारहाण केली. याबाबत आता युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात दहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच बाबतीत ॲड. ज्ञानेश्वरी अंजान यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी...