¡Sorpréndeme!

Ranjit Kasale Arrested: वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणाऱ्या रणजीत कासलेंना स्वारगेटमधून अटक

2025-04-18 0 Dailymotion

Ranjit Kasale Arrested : निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले बीड पोलिसांच्या ताब्यात

बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे काल (गुरूवारी) संध्याकाळी पुण्यात दाखल झाले होते. कासले यांनी पुण्यात दाखल होताच त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या प्रश्नावर आता उत्तर देणार नाही, असं स्पष्ट केलं. माध्यमांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा रणजित कासले यांनी केला आहे. "मी आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे. पुणे पोलीस किंवा बीड पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर करणार आहे", असं रणजित कासले यांनी सांगितलं. मात्र,आत्मसमर्पण करण्याआधीच निलंबित पीएसआय रणजीत कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज (शुक्रवारी) पहाटे बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलं आहे. काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात मुक्कामी होते. पुणे विमानतळावर काल (गुरूवारी) रणजीत कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडं अटक होणार असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं. मात्र आज पहाटे रणजीत कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कसले यांना ताब्यात घेतलं आहे. कासलेंना ताब्यात घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.