Special Report Balasaheb Thackeray यांच्या आवाजामुळे शिवसेना कार्यकर्ते पुन्हा ठाकरेंकडे वळतील?
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाज वापरून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर प्रहार करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या या खेळीमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका नव्या सामन्याला सुरुवात होणार का? हा प्रश्न आहे. याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. या गद्दारांनी. हाच बुलंद आवाज लोकांसमोर आणण्याची चाणाक्ष खेळी ठाकरेंच्या शिवसेने केली. नाशिक मधल्या निर्धार मेळाव्यात चक्क बाळासाहेबांच भाषण झालं. तेही राज्यातल्या ताज्या घडामोडींवर. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात महायुतीचा समाचार घेण्यात आला. सध्याच्या परिस्थितीवर बाळासाहेबच लोकांशी संवाद साधतायत असा आभास निर्माण करण्यात आला. सर्वात आधी भाजपला महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी शिवसेने केलेल्या उपकाराची जाणीव करून. 25 वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. बाळासाहेबांच्या आवाजाने देवेंद्र फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा दिली गेली. अरे हिंदू हिंदू मध्ये भांडण लावली जात आहेत. जाती बोट जातीत मारामाऱ्या लावून ते नाना फडणवीस मजा बघतायत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेच अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेची गद्दार अशी संभावना करताना बाळासाहेबांच्या आवाजात भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अहो ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोबऱ्या सोनापुरात गेल्या. त्यांना. पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाला आहेत हो, पण इतिहासात तुमची नोंद फितर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग दुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. लोकांची कामे केली, मालेगावात अद्वय हिरे, धुळ्यात अनिल गोटे, हे मैदानात होते, पण निकाल उलटेच लागले, विधानसभेच्या निकालाचाही बाळासाहेबांच्या आवाजातून ठाकरी समाचार घेण्यात आला, आता या निवडणुकीत काय झालं, विधानसभेच म्हणतोय, जो निकाल. तो तुम्हाला मान्य आहे का? इथे बडगुजर, वसंत गीते, तिकडे निफाडला, आपला अनिल कदम, घोलप यांचे चिरंजीव योगेश राब राब राबले, लोकांची कामे केली, मालेगावात अद्वय हिरे, धुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते, पण निकाल उलटेच लागले, एका दिग्गज. करून बाळासाहेबांच्या मुखातून एकनाथ शिंदेंवरती टीका करण्यात्मक भाषण तुम्ही तयार करून घेता.