MPSC Student Mumbai : 3 हजार जागा असताना 216 जागांसाठी जाहिराती, MPSC विद्यार्थी आक्रमक
पुण्यातील एमपीएससी (MPSC) तसेच यूपीएससी (UPSC) क्लास चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप आज संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी पुण्यातील (Pune News) अनेक क्लास चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे यांनी महेश घरबुडे यांचे काही व्हॉट्सॲप चॅट तसेच नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा दाखवले. यासोबतच महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी सुद्धा महेश घरबुडे यांच्या विरोधात नागपूर येथील बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
त्याचबरोबर या मोठ्या अधिकाऱ्याने तक्रार करून सुद्धा गुन्हा का दाखल होत नाही. महेश घरबुडे आणि लक्ष्मण हाके हे काल सामाजिक मंत्री अतुल सावे यांना काल (मंगळवारी) भेटले असल्याचं सुद्धा संभाजी ब्रिगेडने यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या सर्व प्रकरणात महेश घरबुडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज संभाजी ब्रिगेडने केली आहे.
बहुजन समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी काही संस्थांची निर्मिती करण्यात आली. सारथी, बार्टी आणि महाज्योती अशा संस्था आहेत, मात्र या संस्था चालकांना तसेच खासगी क्लासेसला चालकांकडून खंडणी मागितल्याच्या दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. एक तक्रार 15 जानेवारीला मिळाली आहे, तर दुसरी तक्रार 20 जानेवारीला मिळाली आहे. ही तक्रार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याच्या विद्यावेतनातील काही भाग मागितल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे. दुसरी तक्रार ही पुणे शहरातील महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी सुद्धा महेश घरबुडे या व्यक्तिच्या विरोधात आहेत. या दोन तक्रारी मिळून देखील त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.