Beed Tomato : 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल; दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा.. अशी मागणी यावेळी करण्यात आली.. दरम्यान याचाच आढावा आणि बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी..