Sambhaji Bhide at Sangli : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
सांगलीमध्ये माळी गल्लीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर रात्री कुत्र्याने हल्ला केला होता. ज्या माळी गल्लीत
कुत्र्याकडून भिडे गुरुजीच्यावर हा हल्ला झाला त्या गल्लीत महापालिकेकडून कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आलीय. संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला.सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली.