¡Sorpréndeme!

ABP Majha Headlines 8 PM Top Headlines 8 PM 14 April 2025 रात्री 8 च्या हेडलाईन्स

2025-04-14 1 Dailymotion

ABP Majha Headlines 8 PM Top Headlines 8 PM 14 April 2025 रात्री 8 च्या हेडलाईन्स  
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळली, एकनाथ शिंदेंबरोबरच अजित पवारही नाराज असल्याची जोरदार चर्चा
फुले सिनेमाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अन्यथा फुले विरूद्ध फडणवीस असा वाद होईल, सामनाच्या अग्रलेखातून भाष्य, फुले विरोधक शक्तींशी आंबेडकरांनी हातमिळवणी केल्याचाही आरोप
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर होती, बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंच्या दाव्यानं खळबळ
धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल.. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप...कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर दिल्याचाही दावा..
ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला, अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण 
पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप...