¡Sorpréndeme!

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5.30 PM : 14 April 2025: ABP Majha

2025-04-14 0 Dailymotion

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5.30 PM : 14 April 2025: ABP Majha 
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांचा खळबळजनक दावा. ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटींची ऑफर दिल्याचा कासलेंचा दावा.  
धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर, करुणा मुंडेंचं वक्तव्य. 
पोलीस अधिकारी रणजीत कासले विक्षिप्त माणूस, खळबळजनक व्हिडीओ बनवणं एवढंच कासलेचं काम, कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा करणाऱ्या कासलेवर अंजली दमानियांची टीका.  
अंजली दमानिया जनतेची दिशाभूल करतायत, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंची टीका. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी.चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहीती. मात्र आपण नाराज नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. 
रक्ताची चार माणसं घरात असतील तर भांड्याला भांड लागतं, शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. खळखळ झाली म्हणजे जिवंतपणा आहे, चंद्रकांत पाटलांचं विधान.