ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 3 PM 14 April 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स
भाजप मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची शक्यता, आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांची नावं चर्चेत, भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक...
चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा, शिंदेंकडून मात्र खंडन, भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं स्पष्टीकरण...
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर होती, बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा, ५० कोटींपर्यंत पैसे देण्यास तयार होते अशी कासलेंची माहिती...
ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला, अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण
रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर, पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असतानाच भूमिजनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर
फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात पण हा जातीवाद अस्तित्त्वात येणार नाही, सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांचं उत्तर