Ajit Pawar Speech : काकांना विश्वासात घेतल्याशिवाय चालत नाही, अजित पवार यांच्या वक्तव्यानं खळबळ!
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी पोहोचले. जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आले आहे.. त्या पाण्याचे पूजन अजित पवारांच्या उपस्थितीत होत आहे. पवार साहेब यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली 91 साली पिंपरी चिंचवड ची लोकसंख्या 6 लाख होती 2041 ला ती 61 होईल योजना करणं आमचं काम आहे परंतु त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे मी इथं अधिकाऱ्यांना घेऊन आले त्याचे कारण आहे की मला काही गोष्टी कळतात तिथे मुंबईला जर कुठला अधिकारी काय म्हटला तर मला सांगता येतं की मी तिथे जाऊन आलोय तुम्ही एअर कंडिशन बसून मध्ये बसून सांगू नका आधी या भागात कुणालाच पाणी मिळत नव्हतं तुम्ही त्यावेळेस म्हणालात की आम्ही जमिनी देतो. आम्हाला पैसे नको फक्त आम्हाला पाणी द्या. परंतु आता तुम्ही पैसे मागायला लागलेला आहात. आम्ही बंद पाईप द्वारे पाईपलाईन करणार आहोत. त्याच्यामुळे खाली जमिनीच्या तीन ते फूट पाईप टाकणार आहोत. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्री झालो. त्यावेळेस मी पुरंदर उपसा योजना केली आहे. तलावात पाईप घालू नका, परकुलेशन झालेलं पाणी घ्या पुरंदर योजनेचे पाणी आपल्याला 12 महिने मिळणार आहे काल 345 वी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी होती आम्ही अभिवादन केले फुले वाड्यात जिथे सावित्रीबाई आणि महात्मा फुले राहायचे तिथे मी गेलो होतो 200 कोटी रुपये स्मारकासाठी मी मनपा ला दिले आहेत.. नवीन नोकरी मिळाल्यावर तिकडे गेले पाहिजे..मी शेती करायचो कतेवाडीत राहायचो पण खासदार झाल्यावर गेलो ना मुंबई ला. 5 वर्षाला आमदाराला मिळतात 25 कोटी. मी 100 दिवसात दीड हजार कोटी आणलेत कशाला म्हातातता. जनावरांचा डॉक्टर असलेला दवाखाना आणलेला आहे. एक जण मला सांगितलं दादा कुत्र आजारी पडलं होतं. त्याला खूप खर्च झाला त्याला विचारले किती तर त्याने दीड लाख रुपये. मोठी लोकं असे खर्च करतात. यावेळी लाडक्या बहिणीकडे लक्ष दिले. त्यावेळी आमच्यावर टीका झाली. निवडणूक झाली योजना बंद करतील पण तसे आमही केलं नाही योजना सुरू ठेवली एक ते सात जणांनी वाटून खाल्ला होता असं म्हणतात कसा खाल्ला होता माहीत नाही पण खाल्ला अजित पवारांनी दोन वेळा कागद मागितला पण कागद न दिल्याने अजित पवार म्हणाले काय हळदी कुंकू टाकायला ठेवला आहे का? काही कळत नाही का? असे म्हणाले पुणे जिल्ह्यात अनेक घर करतो आहे. त्याचा फायदा लोकांना होईल मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी अडचण येऊ देणार नाही. Dp करताना अनेक विचार करावा लागतो. पुढच्या 50 वर्षाचे विचार करून दdp केला आहे. पुरंदर विमानतळ काम हातात घेतले आहे. लोकं विरोध करत आहेत पण विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही..त्यामुळे ते करणे भाग आहे. सुपे येथील Dp करताना 2046 ची लोकसंख्या गृहीत धरून केला आहे. हा प्रारूप आराखडा केलं आहे..हा अंतिम नाही. तुम्ही हरकत घ्या तुम्ही. अन्यायहोऊ देणारे नाही. जमीन जास्त असेल तर घ्यावी लागेल.. राहणीमान बदलत आहे. पूर्वी दोन लुगडी जोडून महिला घालायच्या. पूर्वी पँटीला ठिगळं असायची आता. श्रीमंताची मुले पॅन्ट फाडतात. लगेच यायची ब्रेकींग न्यूज अजित पवार घसरले तुझा trp वाढतो पण आमचं वाटोळं होत आम्ही सरकार म्हणून बसलो आहे..मी गरीबावर अन्याय होऊ देणार नाही..कामे हवेत होणार नाही..त्यासाठी जागा लागेल जातीय सलोखा असला पाहिजे..कुठे कायतरी झालं म्हणून मारहाण करायची हे चालणार नाही..आपण भारतीय आहोत..पम शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचाराने राहिले पाहिजे काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय चालत नाही. अजित पवार लगेच काका कुतवळ यांना म्हणालो..नाहीतर लगेच तुम्ही काही केलं तरी समाधानी नाहीत. जिथं पिकतं तिथं विकत नाही. पूर्वी टॉवरचे काम होत होतं त्यावेळेस एक रुपया मिळत नव्हता परंतु ज्यावेळेस मी मंत्री झालो त्यावेळेस पासून शेतकऱ्यांना पैसे देणे सुरुवात केली तुझ्या आ** किती लाड रे. सांगतोय 100 वेळा परत तसेच मुंबई, पुणे, बारामती,पंढरपूर, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन जाणार त्यात जमिनी जाणार तुमचं भलं करण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावला आहे