¡Sorpréndeme!

Sharad Pawar - Ajit Pawar : पवरांनी बोट ठेवलं, दादा म्हणाले 67 कोटी; रयतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

2025-04-13 0 Dailymotion

Sharad Pawar - Ajit Pawar : पवरांनी बोट ठेवलं, दादा म्हणाले 67 कोटी; रयतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्ष फुटीनंतर जवळीक आणि आधीसारखी चर्चा जरी होत नसली तरी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र येत येताना वारंवार दिसत आहे. अजित पवार यांचे धाटके चिरंजीव जय पवार यांचा दोन दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यांना गेटवरती घ्यायला अजित पवार पोहोचले, त्यानंतर आता शरद पवार हे काल (शनिवारी) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तर अजित पवार हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. हा दौरा अटोपून अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार उपस्थित होते. 

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची काल (शनिवारी, ता 13) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शरद पवार हे साताऱ्यात होते. तसेच अजित पवार देखील या बैठकीसाठी हजर झाले, दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही नेते या बैठकीत अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णयही घेतले. दरम्यान, या बैठकीतला एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यामध्ये शरद पवारांनी अजित पवारांना कागदपत्रातील महत्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदत केली. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं, याबाबत चर्चा सुरु असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सभासदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातामध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतची तपशील होता. पण त्यांना तो मिळत नव्हते. यावेळी शेजारी बसलेल्या शरद पवार यांनी त्यांना ते तपशील शोधून देण्यात मदत केली. शरद पवार यांनी यासाठी त्यांना कागजपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला. यानंतर अजित पवार यांनी आकड्याचं वाचन केलं. हा त्यांचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

शरद पवार यांची बैठकीबाबत सोशल मिडियावर पोस्ट

शरद पवार यांनी त्यांच्या सोशल मिडिया 'एक्स'वरती पोस्ट शेअर करत आजच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज 'छत्रपती शिवाजी कॅालेज, सातारा' येथे पार पडली. या बैठकीत संस्थेने 'रयत' मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण व माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल, असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.