Bhaskar Jadhav Speech : शेवटी आपण मराठीच! मनसेच्या मंचावर भास्कर जाधव यांचं दमदार भाषण
काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी मंगेश सोलकरांच्या गावामध्ये आलो होतो, तिथे कुंडबी समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे गावाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे कुंभार समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या, याच मैदानावर मी आलो होतो, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बेलदार समाजाचे संघ इथ आले होते आणि बेलदार समाजाच्या वतीने देखील स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यापूर्वी तळी याच्या वतीने तळी आयपीएल म्हणून स्पर्धांच आयोजन केलं होतं, मराठा समाजाने स्पर्धांच आयोजन केलं होतं, अशा वेगवेगळ्या समाजाच्या वतीने या स्पर्धांच आयोजन केलं जातं आणि समाजाच्या वतीने स्पर्धांच आयोजन केलं जातं, त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्या समाजा. च्या वतीने या स्पर्धांच आयोजन होतं, त्या समाजाचे संघ, समाजातल्या तरुणांचे संघ, तरुण मुलांचे, खेळाडूंचे संघ, त्या त्या आयपीएल, त्या त्या स्पर्धांमधून खेळत असतात. पण मला विशेष करून प्रमोद गांधीना धन्यवाद दिले पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गोहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा असा उपक्रम. जो आदर्श आहे, जो एक नाविन्यपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये कल्पकता आहे, त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या, पण त्या स्पर्धाना त्यांनी नाव दिलं, एक समाज आणि एक स्पर्धा असच ना काय? एक समाज आणि एक संघ, अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांनी एक नवीन कल्पना आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आणली आणि म्हणून मी त्यांच मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांच्या सर्व सहकारना. धन्यवाद देतो. अशा प्रकारचे त्यांनी सगळ्या समाजाना म्हणजे 12 समाजातल्या 12 संघांना संधी दिली. पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणा एका विशिष्ट समाजाच्या स्पर्धा न भरवता त्यांनी या मैदानामध्ये सर्व समाजाला संधी उपलब्ध करून दिली. हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा आहे. कौतुकास्पद आहे आणि नाविन्यपूर्ण आहे आणि त्या स्पर्धांच विनोद तुम्ही मला... निमंत्रण दिलं अशा प्रकारच ज्यावेळेला एखादा नावीन्यपूर्ण उपक्रम असतो त्यावेळेला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या उपक्रमाच कौतुक करणं तुम्हाला प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करता ते अधिक तुमच्याकड हातून चांगलं व्हावं या करता म्हणून तुम्हा सर्वांना वाटेल ती वेळेला प्रसंगी मदत करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी. तुमदा तुम्हा या ठिकाणी कौतुक करण्याकरता आलो. तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलो. तुमच्या ह्या नाविन्यपूर्ण कल्पनेच या ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावं अशा प्रकारचा आव्हान करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो. बांधवानो, भगिनींनो, आज आपण अशा पद्धतीन की शेवटी तुम्ही आम्ही सगळी महाराष्ट्रातली म्हणा, आपल्या मतदारसंघातली म्हणा, जिल्ह्यातली म्हणा, ही मराठी माणसं आहोत. आणि हे मराठी माणसं... कुठल्याही जाती धर्मामध्ये विभगली असली तरी शेवटी आम्ही सगळे मराठी आहोत अशा भावनेने एका छत्राखाली तुम्ही सर्वांना आणलत त्याबद्दल तुम्हाला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना खेळाडू अतिशय उत्तम प्रकारचा खेळ याठिकाणी करतायत.