अनेक जणांना PF चे पैसे काढायचे आहे. पण त्यांना EPFO अकाऊंटचं पासवर्ड माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओतून आपण EPFO पासवर्ड रिसेट कसं करायचं? याची माहिती जाणून घेणार आहोत...
१.सर्वात आधी तुम्हाला गुगलवर LOGIN EPFO असं सर्च करायचं आहे. २.त्यानंतर तुम्हाला वरती ईपीएफओ ची वेबसाइट आली असेल. त्यावर क्लिक करा.३. आता तुमच्यासमोर UAN मेंबर सेवाचं पेज उघडलं असेल.४. तिथे तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड टाकायचं ऑप्शन आलं असेल. पण आपल्याकडं पासवर्ड नाही. त्यामुळे त्याला रिसेट करायचं आहे. खाली पासवर्ड रिसेट करायचं ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.५. आता तुम्हाला इथे UAN नंबर आणि captcha कोड भरायचं आहे.६.आता तुम्हाला इथे तुमचं नाव, जन्मतारीख आणि तुमचं जेंडर काय आहे ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर त्याला verify करून घ्या.७.त्यानंतर तुम्हाला आता पुन्हा आधारकार्ड नंबर आणि captcha भरायचा आहे.८. त्यानंतर आता तुम्हाला आधार लिंक नंबर टाकायचं आहे.९. त्यानंतर पुन्हा otp आणि captcha कोड टाकून sumbit करा. आता तुम्हाला नवीन password जनरेट करायचं आहे.१०. तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे तो टाका. अशा प्रकारे तुमचं पासवर्ड रिसेट झालं आहे.