¡Sorpréndeme!

Amit Shah At Sunil Tatkare Home : स्नेह भोजनासाठी अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी दाखल

2025-04-12 2 Dailymotion

Amit Shah At Sunil Tatkare Home : स्नेह भोजनासाठी अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी दाखल  
अमित शाहांची भोजनासाठी सुनील तटकरेंच्या गीताबाग निवासस्थानी भेट ..तटकरे कुटुंबीयांकडून स्नेहभोजनाचं आयोजन ....   शाहांच्या जेवणासाठी आमरस पुरी, मिसळ पाव, मोदक, साबुदाणा वडा  भोजनाला उपस्थित मांसाहारी लोकांसाठी मटणाचा बेत... 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर ते दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार  सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेह भोजनास येणार आहेत. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्य व  केंद्रीय मंत्री मंडळातील मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहे. अमित शाह यांच्या तटकरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेह भोजनामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याचा कुठलाही राजकीय संबंध नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय.